मायमर हॉस्पिटल मध्ये काम करणारे डॉक्टर,नर्स,स्टाफ यांना विमा कवच द्या -मा.राज्यमंत्री बाळा भेगडे

Talegoan Dabhade
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या संकटाचा सामना करण्यासाठी मावळ तालुक्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने मायमर हॉस्पिटल तळेगाव दाभाडे येथे कोविड-19 केअर सेंटर उभारुन उपाययोजना करण्याबाबत मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांची शासकिय अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न झाली.

यावेळी मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी हॉस्पिटल मध्ये काम करणारे डॉक्टर, नर्स,स्टाफ यांना विमा कवच देण्याची मागणी केली,येथील रुग्णांना २ वेळचे जेवण मिळावे आणि कोणताही रुग्ण रुग्णवाहिके शिवाय वंचित राहू नये अश्या सूचना केल्या.

याला उत्तर देताना प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी सर्व स्टाफ का ५० लाखाचे विमा कवच देण्याचे सांगितले,रुग्णवाहिका आणि जेवणाचे व्यवस्थित नियोजन करण्याचे आश्वस्त केले.

यावेळी आमदार सुनील शेळके,मावळ प्रांत संदेश शिर्के,तहसीलदार मधुसूदन बर्गे,नगराध्यक्ष चित्राताई जगनाडे,डॉ.सुचित्रा नागरे मॅडम,डॉ.दिलीप भोगे,पोलीस निरीक्षक मा.अमरनाथ वाघमोडे,गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी,
डॉ.लोहारे,मुख्याधिकारी दीपक झिंजाड,मुख्याधिकारी सचिन पवार,मुख्याधिकारी ओगले मॅडम,आदी उपस्थित होते
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.