पुणेकरांची चिंता वाढली… पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांची वेगाने वाढ!

पुणेकरांची चिंता वाढली… पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांची वेगाने वाढ!
पुणे, (सिंहगड टाईम्स) देशात कोरोनाने आता आक्राळ विक्राळ रूप धारण केले असून इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आहेत. मुंबई पाठोपाठ पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये दररोज भर पडत आहेत. सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये विक्रमी वाढ झाली आहे.

पुणे शहरातील 193 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून यात नायडू-पुणे महापालिका 141, खासगी रुग्णालय 39 आणि ससूनमधील 13 रुग्णांचा समावेश आहे. सध्या 245 क्रिटिकल रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यात 49 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. शहरातील एकूण अ‌ॅक्टीव्ह रूग्णसंख्या आता 3722 एवढी आहे.

पुण्यात सुरूवातीचे काही दिवस कंटेनमेंट झोनमध्ये अधिक रूग्णसंख्या मिळत होती. मात्र अनलॉकिंगला जेव्हापासून सुरूवात झाली आहे तेव्हापासून नागरिकांची पुण्याच्या इतर ठिकाणी ये जा सुरू झाल्याने आता ग्रीन झोनमध्येही रूग्णसंख्या मिळू लागली आहे त्यामुळे साहजिकच पुणेकरांनी काळजी घेण्याची गरज आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.