नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बावधन मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन

नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बावधन मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन
बावधन: नगरसेवक दिलीपअण्णा वेडेपाटील यांच्या ५६व्या वाढदिवसानिमित्ताने सोमवार दि. १ जून रोजी विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमांचे उदघाटन खडकवासला मतदार संघाचे आमदार भिमरावआण्णा तापकीर व राजेशजी पांडे (संघटन सचिव,महाराष्ट्र प्रदेश) यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला

 आर्सेनिक अल्बम-३० या रोगप्रतिकारक शक्ती वाढविणार्‍या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले असून टप्या टप्याने संपूर्ण प्रभागात वाटप करण्यात येणार आहे.

प्रभागातील सोसायट्यानां हॅन्ड फ्री सॅनिटायझर स्टॅन्ड चे मोफत वितरण करण्यात आले. ज्या काही राहिलेल्या सोसायटी आहेत त्यांना टप्या टप्याने संपूर्ण प्रभागात वाटप करण्यात येणार आहे 

अन्न-धान्यांचे वाटप गरजू गोरगरीब, सफाई कर्मचारी व शास्त्रीनगर स्मशानभूमी येथील कर्मचार्यांना अन्नधान्य किट व फेस शिल्ड मास्कचे  वितरण करण्यात आले

प्रभागामध्ये ऑटोमेटेड सॅनिटायझेशन वॉश बेसिन बसविण्यात आले जेणेकरून करोनाच्या पार्श्वभूमीवर  पातळीवर बाहेर पडणाऱ्या नागरिकांना वेळोवेळी आपले हात स्वच्छ धुवून घेता येणार आहेत.

 आपल्या प्रभागामध्ये वृक्षरोपण केले आहे तसेच झाडांना लोखंडी जाळी बसवून टँकरद्वारें झाडांना पाणी देण्यात येणार आहे.

डॉकटर आपल्या दारी हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी आवश्यक त्या औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी प्रभागातील पुनीतजी जोशी (कोथरूड विधानसभा अध्यक्ष,भाजपा) नगरसेवक किरण दगडे पाटील, नगरसेविका अल्पना गणेश वरपे,नगरसेविका डाॅ.श्रद्धा प्रभुणे-पाठक, स्वीकृत सदस्य विलास मोहोळ, स्वीकृत सदस्य बाळासाहेब टेमकर, राजाभाऊ जोरी, अजय मोहोळ, धनंजय दगडे, सागर कडू, राजेश मनगिरे,रूपेश भोसले,सुरेंद्र कंधारे, अभिजित गाडे, राहुल जाधव, सचिन धनकुडे,स्वप्नील आमटे, बाळासाहेब जेधे, अरुण वेडेपाटील, रमेश वेडेपाटील,राजू करंजावणे, सरचिटणीस गिरीश भेलके,सुहास साठे,राजेश कुलकर्णी, गणेश लोखंडे, वसंत रजावट, सुरेश गुरव, पांडुरंग वेडेपाटील, पप्पू वाघमारे,संदीप वेडेपाटील,प्रसाद वेडेपाटील,केतन वेडेपाटील,अमित वेडेपाटील व रोटरी क्लबचे सदस्य आदि भाजपा प्रभाग क्र १० चे सर्व पदधिकारी, आणि मित्र परिवार उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन  बाळासाहेबजेधे यांनी केले. शैलेश वेडेपाटील यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.