पौड पोलीस स्टेशन गु.र.न. 17/2020 भा.द.वि. 307 व मोक्यातील अरोपी नामे अक्षय रोहिदास पडळघरे, वय 23 वर्षे रा.पडळघरवाडी,रीहे ता. मुळशी जि. पुणे हा पडळघरवाडी येथे लग्नाला येणार असले बाबत पो.ह.वा. अब्दुल शेख यांना गोपनीय माहिती मिळाले वरून मा. संदीप पाटील पोलिस अधीक्षक सो, मा.विवेक पाटील अपर पोलीस अधीक्षक सो, मा. सई भोरे पाटील उप विभागीय पोलिस अधिकारी हवेली सो. यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या आदेशाने पोलिस उप निरीक्षक अनिल लवटे, पोलिस हवालदार अब्दुल शेख, पोलिस हवालदार बाबा शिंदे, पोलिस शिपाई सुहास सातपुते , पोलिस नाईक जय पवार, चालक पोलिस हवालदार संतोष कुंभार यांचे पथक तात्काळ सदर ठिकाणी पाठविले व सदर पथकाने त्याठिकाणी जाऊन सापळा लावून आरोपी पळून जात असताना आरोपीस शिताफीने पकडून ताब्यात घेतले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास डॉ सई भोरे पाटील उप विभागीय पोलिस हवेली या करीत आहेत.
पौड पोलीस स्टेशन येथील मोक्यातील पाच महिन्यां पासून फरार असलेल्या आरोपीस अटक
0
मंगळवार, जून २३, २०२०
Tags