मंत्रालय मुख्य संपर्क प्रमुख नितीन जाधव यांची थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कडे मागणी
विशाल भालेरावसिंहगड: दैनिक प्रभात चे पुणे येथिल पत्रकार उत्कृर्ष म्हस्कू खवले यांना व त्यांचे आई सह कूटूंबीयांना दिनांक 19 जून रोजी सायंकाळी कोंढवा येवलेवाडी येथे दोन ईसमाकडून जबरी मारहाण करण्यात आली होती. त्या संदर्भात खवले यांचे वडील पत्रकार म्हस्कू खवले व पुणे शहरातील पत्रकार बांधवांनी कोंढवा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे . पण मारहाण करणारे आरोपींना अटक होत नाही तसेच पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद केला जात नाही. या घटनेमुळे संपूर्ण खवले कुटुंबीय दहशतीखाली आहे. पुणे शहर जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये या घटनेमुळे घबराट पसरली आहे .
पत्रकार उत्कर्ष खवले हे बातमीच्या कामासाठी बाहेर जात होते पण त्यांना अडवून दुखापत होई पर्यत जबरी मारहाण केली तसेच त्यांच्या आईला पण धक्का बुक्की केल्याचा तक्रारी त उल्लेख आहे. मारहाण करणाऱ्या आरोपी वर पत्रकार संरक्षण कायद्याने कारवाई व्हावी अशी मागणी पत्रकार म्हस्कू खवले यांनी केली आहे. याच कारणासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मंत्रालय मुख्य संपर्क प्रमुख नितीन जाधव यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन वर सर्व हकीकत सांगितली व पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत सदरच्या आरोपी वर कारवाई करण्याची मागणी केली तेव्हा गृहमंत्र्यानी तात्काळ पुणे झोन पाच चे डिसीपी यांना सुचना देत कारवाई करण्याचे संकेत दिले.