खडकवासला मनोरंजन पार्क (Amusement Park) प्रकल्पाला कडकडून विरोध, खडकवासला ग्रामस्थ घेणार कोर्टात धाव

खडकवासला मनोरंजन पार्क (Amusement Park) प्रकल्पाला कडकडून विरोध, खडकवासला ग्रामस्थ घेणार कोर्टात धाव
विशाल भालेराव
राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय जयंत पाटील साहेब यांनी नुकतेच खडकवासला धरण परिसरातील खडकवासला व कोपरे यांच्या हद्दीतील पाटबंधारे खात्याच्या २८ एकर जागेवर 'खडकवासला धरण परिसर सुशोभीकरण व विकास' अंतर्गत  पर्यटन केंद्र (Amusement Park) या प्रकल्पास मान्यता दिली. 'बांधा वापरा व हस्तांतरित करा' या तत्त्वावर होत असलेल्या या प्रकल्पासाठी निविदाही मागविण्यात आल्या आहेत.

तसेच महिनाभरापासून वरिष्ठ अधिकारी धरण परिसरात येऊन पाहणी करत संदर्भात पाहणी करत आहेत. सदर जागेवरील मनोरंजन पार्क  (Amusement Park) च्या विरोधात खडकवासला गावातील सर्व ग्रामस्थ एकवटले असून या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे असे खडकवासला गावचे सरपंच सौरभ मते यांच्याकडून सांगितले आहे. याबाबत सरपंच आणि विविध पक्षातील पदाधिकारी यांची सोशल डिस्टन्स ठेवून बैठक पार पडली.

सदर बैठकीत या मुद्यांवर सखोल चर्चा
शेतकऱ्यांच्या जमिनी खडकवासला धरणासाठी अधिग्रहण करण्यात आल्या असून मंग त्या पर्यटनाच्या नावाखाली खाजगी व्यवसायीनकांच्या घशात का घालायच्या? ह्या निर्णय प्रकियेत खडकवासला ग्रामपंचाय आणी ग्रामस्थानां अजिबात विश्वासात घेतले नसून हा निर्णय परस्पर निर्णय कशासाठी घेतला? रयत शिक्षण संस्थेच्या यशवंत विद्यालयाला हक्काची जागा नसताना, पर्यटन केंद्राचा अट्टाहास कशासाठी? आणि एवढ्या तडकाफडकी जागा देण्यास पाटबंधारे विभागाने कशी काय परवानगी दिली? सदर प्रकल्प घाई घाईत मंजूर केला असून या प्रकल्पाचे नियोजन करताना स्थानिक ग्रामस्थ व ग्रामपंचायततीला विश्वासात घेतलेले नाही.

 या बैठकीत चर्चेअंती एकमताने असा निर्णय घेण्यात आला की, "कोणत्याही परिस्थितीत हा पर्यटन प्रकल्प किंवा धरणाच्या लगतच्या जमीनीचा व्यवसायिक वापर खडकवासला ग्रामस्थांकडून होऊ दिला जाणार नाही". सदर प्रकल्पाची निविदा प्रक्रिया तातडीने थांबवावी'' असे निवेदन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांना देण्यात येणार आहे. या वेळी सरपंच सौरभ मते, तंटामुक्त समिती अध्यक्ष अक्षय दत्तात्रय मते, पोलीस पाटील ऋषिकेश प्रकाश मते, विलास मते, अशोक लक्ष्‍मण मते, सिताराम सादबा मते, मुरलिधर मते, सुरेश तुकाराम मते, आनंद माधव मते, विजय बाबासाहेब मते, महेश लक्ष्मण मते, राहुल मुरलिधर मते, नंदकिशोर जगन्नाथ मते,संग्राम शांताराम मते आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Khadwasla

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.