विशाल भालेराव
खडकवासला: पुण्यातील पहिला रूग्ण सिंहगड रस्ता परिसरात आढळला होता. मार्च महिन्यात पहिला रूग्ण आढळला. त्यानंतर मे महिन्यापर्यंत रूग्ण संख्येत फारशी वाढ झाली नव्हती, परंतु खडकवासला परिसरात २ महिला करोना पॉझिटिव्ह आढळुन आल्या आहेत. त्यातील एक महिला डॉक्टर आहे.
यातील एक डॉक्टर महिला पुण्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून आठवड्यातुन फक्त एक दिवस ती घरी खडकवासल्यातील आपल्या घरी येत असे, यापूर्वी मागच्या आठवड्यामध्ये या महिलेची चाचणी घेतली घेतली असता ती निगेटिव्ह आलेली. काल त्या महिलेची चाचणी केली असता सदर महिला करोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. महिलेच्या घरातील पतीचा करोना अहवाल हा निगेटिव्ह आला आहे.
दुसरी जी महिला करोना बाधित आहे त्या बद्दल माहिती घेतली असता पायाचा गुढगा दुखत असल्या कारणाने त्यावर उपचार करण्यासाठी तीन दिवसापूर्वी सदर महिला पुण्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये गेली असता त्या ठिकाणी त्या महिलेची करोना करोना टेस्ट घेतली असता अहवाल हा पॉझिटिव्ह आलेला आहे, त्यामुळे सदर महिलेच्या कुटुंबातील सहा जणांना तपासणीसाठी नवले हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे तसेच २० जणांना काॅरटाईन केले जाणार असल्याची माहिती खडकवासला आरोग्य केंद्राचा वैद्यकीय अधिकारी डाॅ वंदना गवळी यांनी माहिती दिली.
खडकवासला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संपूर्ण परिसरात औषध फवारणी करून निर्जंतुकीकरणाचे काम करून घेतले आहे. हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी खडकवासला गावचे सरपंच सौरभ मते व इतर सदस्यांच्या करोना बाधित राहणारा परिसर बॅरिगेट लावून सील केला आहे.

या वेळी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मास्क चा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्स पाळावे, ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग योग्य ती खबरदारी घेत आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन खडकवासला चे सरपंच सौरभ मते यांनी केले.