पडळकरांविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला विधानसभा मतदारसंघात जोडे मारो आंदोलन

सिंहगड टाईम्स : दि. २५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खडकवासला मतदार संघ पुणे (ग्रामीण)च्या वतीने राष्ट्रीय नेते आ. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर बेतालपणे जाहीर वक्तव्य करणाऱ्या बि.जे.पीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी उत्तमनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी.आय.श्री सुनील पंधारकर साहेब यांना मा. त्रिंबक आण्णा मोकाशी, अध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खडकवासला मतदारसंघ पुणे, पुणे (ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. तसेच  बी.जे.पी.आमदार गोपीचंद पडळकर याच्या वक्तव्याचा जाहीर निषेध म्हणुन त्याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.


यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्या सौ. अनिताताई इंगळे, उत्तमनगरचे मा. सरपंच श्री. सुरेश आण्णा गुजर, श्री. संदीप तुकाराम ऊदमले, उप-अध्यक्ष, सोशल मीडिया, राष्ट्रवादी काँग्रसपक्ष पुणे, कुडजेगावचे सरपंच श्री.समीरजी पायगुडे, मा. उप सरपंच श्री.अतुल आप्पा धावडे, युवा नेते आ.अतुल दांगट पा., सामाजिक कार्यकर्ते श्री. विकास दांगट पाटील पा., श्री.नंदू मोकाशी, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विशालजी भालेराव तसेच अल्पसंख्यक विभागाचे अध्यक्ष श्री. आरिफभाई सय्यद तसेच ईतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.