मागासलेल्या परिस्थितीवर मात करत नकुल पोळेकरचं यश
विशाल भालेराव
सिंहगड - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.१९) जाहीर करण्यात आला त्यात वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम अशा पानशेत विभागातील ठाणगांव येथील नकुल पोळेकर याची नायब तहसीलदार पदी निवड झाली आहे.
सर्वसाधारण वर्गातून परिक्षा देऊन मागासलेल्या परिस्थितीची 'लक्ष्मण रेखा' भेदत नकुल पोळेकर यानी आपल्या स्वप्ननांना साक्षत उतरवत राज्य लोकसेवा परिक्षेत उत्तुंग यश प्राप्त करून नायब तहसीलदार बनला. जिद्द, चिकाटी आणि कष्टाची तयारी असेल तर काहीही अशक्य नाही, हेच नकुल यानी दाखवून दिले.
ठाणगांव (ता.वेल्हे) या भागात दळण वळणाची कोणतीही साधनं नसताना शिक्षणासाठी नकुल पोळेकर याने वस्तीगृहात किंवा नातेवाईकांकडे राहून शिक्षण पूर्ण केले. कोणाचीही साथ नसताना खडतर असा प्रवास करुन ईच्छीत स्थळी कसे पोहचावे याचा आदर्श तालुक्यातील तरूणांन समोर ठेवला. अर्थिक परिस्थिती जेमतेम असूनही खाजगी कंपनीत नोकरी करत व मिळालेल्या वेळेत अभ्यास करून नायब तहसिलदार ही परिक्षा नुकतीच उत्तीर्ण केली.आणि मागासलेल्या तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्याच्या या यशाचे संपुर्ण वेल्हे तालुक्यातून कौतुक होत आहे.