खडकवासला विधानसभा मतदार संघ ग्रामिण कडून विधान परिषदेचे आमदार पडळकरांचा जाहिर निषेध

सिंहगड टाईम्स-महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणावर शरद पवारांना केवळ राजकारण करायचे आहे. आजपर्यंत अनेक बहुजन समाजावर पवारांनी अत्याचार केले. हे नेतृत्व राज्याचे असू शकत नाही. त्यामुळे शरद पवारच महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर येथे केली. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा खडकवासला विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला. याबाबत हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांना निवेदन देण्यात आले

यावेळी  खडकवासला विधानसभा मतदार संघाचे ग्रामीणचे अध्यक्ष त्र्यंबकआण्णा मोकाशी, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक चे सरचिटणीस  दिपक मते , पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष किरण मते, खडकवासला विधानसभा मतदार संघ अल्पसंख्याक अध्यक्ष अरिफभाई सय्यद, खडकवासला विधानसभा मतदार संघ सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष विशाल भालेराव, खडकवासला विधानसभा मतदार संघ सामाजिक न्याय विभाग सरचिटणीस महेश दिवार पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.