१३ जणांचे अहवाल निगेटिव्ह
विशाल भालेराव
पानशेत दि. २७ (सिंहगड टाईम्स) पानशेत परिसरातील करोनाची साखळी तोडण्यास प्रशासनाला यश आले आहे. वेल्हे तालुक्यातील कादवे येथील १३ जणांचे करोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी दिली.
तालुक्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३५, बरे झालेले रूग्ण ३२ आणि उपाचर घेत असलेले रूग्ण ३
कादवे येथील ४२ वर्षीय महिलेस कोरोनाची बाधा झाल्याचे २३ जून रोजी स्पष्ट झाले होते. संबधित महिलेच्या संपर्कातील चौदा व्यक्तींना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये तेरा जणांची टेस्ट निगेटिव्ह, तर संबंधित महिलेच्या घरातील आणखी एका महिलेस करोनाचा संसर्ग झाल्याचे २४ जून रोजी निष्पन्न झाले होते. या नवीन लागण झालेल्या महिलेच्या संपर्कातील आणखी १३ जणांचे स्वॅब (घशातील द्राव) वेल्हे येथील कोवीड केअर सेंटरमध्ये घेण्यात आले होते.
२५ जुन रोजी तपासणीसाठी पाठविले असता २७ जुन रोजी त्या १३ जणांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आशा वर्कर्स, आरोग्य विभाग आणि प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. तरी नागरिकांनी बेफिकीर न राहता खबरदारी घ्यावी. बाहेर पडताना मास्क वापरावा तसेच सोशल डिस्टन्स पाळावे असे आवाहन सहा. पोलिस निरिक्षक विनायक देवकर करण्यात येत आहे.