विशाल भालेराव
सिंहगड-कुसगाव ता.भोरमध्ये रविवारी दिनांक (२१) रोजी सुनिल नलावडे सर यांची संकल्पना राबवण्यात आली .कुसगाव येथील डोगरांवर कडुलिंब ३०० झाडे, वड, पिंपळ अशी ५० झाडे आशी एकुण ३५० झाडाची लागवड करण्यात आली.
सिंहगड-कुसगाव ता.भोरमध्ये रविवारी दिनांक (२१) रोजी सुनिल नलावडे सर यांची संकल्पना राबवण्यात आली .कुसगाव येथील डोगरांवर कडुलिंब ३०० झाडे, वड, पिंपळ अशी ५० झाडे आशी एकुण ३५० झाडाची लागवड करण्यात आली.
साधारणता दोन महिने या वृक्षलागवड साठी नियोजन करण्यात आले होते. खड्डे खोदाई त्यात शेण खत भरणी करणे. या कामामध्ये सुदेव नलावडे, कुसगावचे माजी सरपंच देविदास कदम, उपसरपंच संजय बापु वाशिवले, ह.भ.प माऊली महाराज शेडगे, लक्षदीप तांबट, हरिदास बारगे, शिवाजी चोरमले, अमित शेलार तसेच झाडाची वाहतूकसाठी व व्यवस्थेसाठी आप्पा गोरे यांनी सहकार्य केले. जागर शिवशाही, तरुण मंडळ आणि महिला मंडळ सहभागी झाले होते.