मुंबई: आपल्या खास कौटुंबिकशैलीने आणि देहबोलीने सर्वसामान्य माणसाला "घरातला माणूस"हा विश्वास देण्यात यशस्वी झालेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता देशाच्या "लोकप्रिय नंबर वन" मुख्यमंत्र्यांच्या यादीत आले आहेत. देशभरात झालेल्या सर्वेक्षणातून हे सिद्ध झाले. मुंबई आणि महाराष्ट्र देशाच्य कोरोनाग्रस्तांच्या यादीत गतीने पुढे सरकत असताना, उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता मात्र मोठ्या गतीने वाढत असल्याचे त्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात. आता ही लोकप्रियता टिकविण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे पुढची वाटचाल कशी करणार, याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी आयएएनएस आणि सी व्होटर्स या संस्थेने संयुक्तरित्या केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता ७६.५२ टक्के असल्याचे म्हटले आहे.
इतकच नाही तर उद्धव ठाकरे यांचा समावेश देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये झाला आहे.
आयएएनएस आणि सी व्होटर्सने देशभारातील वेगवेगळ्या राज्यांमधील जनतेकडून राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावरील नेत्यांच्या लोकप्रियतेबद्दल जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केलं. यामध्ये राष्ट्रीयस्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बहुतांश लोकांची पसंती दिली. ६६.२० टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांना पसंती दर्शवली तर २३.२१ टक्के लोकांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पसंत असल्याचे म्हटले आहे. याच सर्वेक्षणामध्ये देशातील मुख्यमंत्र्यासंदर्भातही काही प्रश्न विचारण्यात आले.
या सर्वेक्षणानुसार बिजू जनता दलाचे (बीजेडी) अध्यक्ष आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. ८२.९६ टक्के लोकांनी पटानायक यांच्या कामाबद्दल समाधानी असल्याचे म्हटलं आहे. त्या खालोखाल दुसऱ्या स्थानावर छत्तीसगडमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (८१.०६ टक्के), तिसऱ्या स्थानावर केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन (८०.२८) यांचा समावेश आहे. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये चौथ्या स्थानावर असण्याचा मान वायएसआर काँग्रेसचे प्रमुख तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (७८.५२ टक्के) यांना मिळाला आहे. तर पाचव्या स्थानावर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत.
उद्धव ठाकरे यांना ७६.५२ टक्के मते मिळाली आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अऱविंद केजरीवाल यांचे नाव असून त्यांची लोकप्रियताही उद्धव ठाकरेंपेक्षा कमी आहे. केजरीवाल यांना ७४ टक्के मते आहेत.सर्वात कमी लोकप्रियता असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये हरणायाचे मनोहर लाल खट्टर (४.४७ टक्के मते), उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत (१७.७२) आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (४२.७९) या तीन भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यांमधील मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. तळाच्या पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये जनता दल युनायटेडचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (३०.८२) आणि काँग्रेसची सत्ता असणाऱ्या पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (२७.५१) यांचा समावेश आहे.
राजा माने