क्रिडांगणेच नाहीत तर कसे घडणार दर्जेदार खेळाडू, राखीव भूखंडाची गरज.- रमेश पवार

क्रिडांगणेच नाहीत तर कसे घडणार दर्जेदार खेळाडू, राखीव भूखंडाची गरज.- रमेश पवार
विशाल भालेराव
सिंहगड टाईम्स - मुलांसाठी क्रिडांगणे जवळपास नामशेष झाली. युवा पिढीला मैदानेच उपलब्ध नसल्याने त्यांना मैदानी खेळापासून वंचित रहावे लागत आहे .त्यामुळे त्यांच्या शारिरीक वाढीवर दुष्परिणाम दिसत आहे.क्रिडागण नसेल तर ग्रामीण भागातून दर्जेदार खेळाडू घडणार कसे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.प्रत्येक गावच्या विकास आराखड्यात क्रीडांगणाची सोय करणे अत्यावश्यक बनले आहे हवेली तालुका सुजलम सुफलाम आहे.त्यामुळे बहुतांश भागात नदीसह तलाव विहिरीना मुबलक पाणी उपलब्ध आहे.शेतशिवारासह माळरान आणि डोंगर उतारावरही कृषी पंपाव्दारे पाणी पोचत असल्याने बहुतांश जमिनीत आणि रानमाळावरही पिके डोलू लागली परिणामी गावकुसाबाहेरिल जागा पिकाखाली आल्याने मुलांची हक्काची मैदाने   नामशेष झाली आहेत.गल्ली,चौक,शाळाखेरीज कुठेही मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त जागा उरलेली नाही परिणामी ग्रामीण मुलांच्या शारीरीक,बौध्दिक वाढिवर दुष्परिण जाणवत आहेत.ग्रामीण मुलांमध्ये प्रचंड शारीरिक क्षमता असते. पण प्रशस्त मैदानेच संपुष्टात येऊ लागल्याने कबड्डी,खो-खो आट्यापाट्या, लंगडी, क्रिकेट, फुटबाॅल, धावणे यासारख्या मैदानी खेळापासून वंचित रहावे लागते. त्यामुळे या खेळांतील ग्रामीण मुलांचा विकास खुंटण्याची भीती व्यक्त होत आहे. खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवण्यासाठी कसून सराव करावा त्यासाठी प्रशस्त क्रिडांगण हवीत त्यामुळे ग्रामीण खेळाडू चे नुसकान होत आहे.


ग्रामिण भागातील मुलं शारीरिक दृष्टीने  काटक त्यांच्यामध्ये मैदानी खेळामध्ये भरारी घेण्याची विलक्षण क्षमता आहे.पण त्यांना सरावासाठी प्रशस्त मैदानेच नाहीत. आशी मैदाने निर्माण  करणे काळाची गरज बनली आहे. मैदानी खेळामध्ये करिअर करायचं आहे .पण परिसरात मोठी क्रिडागणे नाहीत.त्यामुळे खेळाडू म्हणून करियर करण्याचे स्वप्न साकार होईल का?असा न्यूनगंड मनात येत आहे . रमेश पवार - खेळाडू खानापूर

टिप्पणी पोस्ट करा

5 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. अगदी खरं आहे ,रमेश पुण्याच्या आताच्या क्रिकेटप्रेमी ची संख्या लक्षात घेता ,किमान अजून 10 ते 12 चांगल्या दर्जाची ग्राउंड उपलब्ध होणे गरजेचे ,यूरोपीय शहरात आपल्या पुण्य पेक्षा आकाराने ,आणि लोकसंख्या ने लहान शहरात तिप्पट ग्राउंड उपलब्द आहेत ,पुढे जाऊन मी तर म्हणतो ,प्रत्येक शाळेला एक क्रिकेट ग्राउंड हवंच

    उत्तर द्याहटवा
  2. मैदान असतील तरच खेळाडू घडतील...

    उत्तर द्याहटवा
  3. अगदी बरोबर,ग्राउंड असणे गरजेचे आहे.

    उत्तर द्याहटवा