मोदीजी गेल्या ६ वर्षात चीनला १८ वेळा चकरा मारुन साध्य काय झालं? - रुपाली चाकणकर

Rpali chakankar
चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जायचे नसेल तर मोदीजी हीच वेळ आहे ५६ इंच छाती दाखवण्याची… बलिदानाचा बदला घेण्याची, असं महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. गलवान व्हॅलीमध्ये चीनने केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतानाच शहीद झालेल्या जवानांना रुपाली चाकणकर यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ पासून चीनला १८ वेळा म्हणजे सरासरी वर्षाला तीनवेळा जावून आले आहेत. इतक्या चकरा मारुन साध्य काय झालं असा सवालही चाकणकर यांनी विचारला आहे.

एकीकडे आत्मनिर्भर भारत या मुद्याला रेटत स्वदेशी नारा दिला आणि मागील काही दिवसापूर्वीच १२ जूनला दिल्ली- मेरठ मेट्रोच्या कामात एल&टी या भारतीय कंपनीला डावलून चीनी ‘शांघाय टनेल इंजिनिअरिंग कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलात? मग रेल्वे कुणाच्या अखत्यारीत आहे? केंद्राच्या म्हणजे आपल्याच ना?? मग हा स्वदेशी अपनाओ चा नारा कशासाठी ?? असा संतप्त सवालही रुपालीताई चाकणकर यांनी केला आहे.

एकीकडे "चीनको लाल आख दिखानी चाहीये" असं म्हणता आणि डोळे पांढरे होतील एवढी मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट या चीनलाच देता? असं कसं चालेल आदरणीय मोदीजी?

भारतीयांच्या भावनांशी खेळत माध्यमांना हाताशी पकडून मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करायचं आणि याच चीनच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट द्यायची ही आम्हा भारतीयांसकट तुम्ही स्वतःची फसवणूक करता आहात असं नाही वाटत का आपल्याला?? असाही प्रश्न रुपालीताई चाकणकर यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.