सचिन दोडके यांचे काम युवा पिढीला प्रेरणा देणारे - नवनाथ पारगे
विशाल भालेरावबऱ्याच दिवसापासून खामगाव मावळ पुलाचे काम रखडले आहे, त्यामुळे परिसरातील वाड्यांच्या नागरिकांची गैरसोय होत असताना खामगाव पुलाच्या कामाची पहाणी करण्यास सचिन दोडके आणि नवनाथ पारगे खामगाव येथे आले होते. यावेळी पुलाच्या कामासदर्भात ठेकेदाराला व नागरिकांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले.
उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी असल्यावर शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत कशा पोहोचवल्या जातात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नगरसेवक सचिन दोडके हे आहेत यांचे सामाजिक, राजकीय काम युवा पिढीला प्रेरणा देणारे आहे. नवनाथ पारगे मा.जिल्हा परिषद सदस्य
खामगाव मावळ येथील चांदेवादी, माळवाडी, मोगरवाडी, खरमरी ग्रामस्थांना या पुलाशिवाय येण्या-जाण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने गावकरी, शेतकरी, दूध उत्पादक, कामगारांना या पुलावरून ये जा करावी लागते. येत्या दोन दिवसामध्ये चांगला पाऊस झाला तर या भागाचा संपर्क पूर्णपणे तुटून नैसर्गिक आपत्ती उद्भवु शकते अश्या परिस्थिती मध्ये खामगाव पुलाचे काम पाऊस पडण्याच्या अगोदर होणे गरजेचे आहे. या वेळी नवनाथ पारगे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
जाहिरात