विशाल भालेराव
- सिंहगड टाईम्स - शिवजन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातील बोरी बु.गावातील श्रृतिषा सुभाष पटाडे हिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या २०१९ मध्ये झालेल्या परिक्षेत घवघवीत यश संपादन करून तिची उप-जिल्हाधिकारी म्हणून निवड झाली आहे.तिच्या या निवडीमुळे ग्रामस्थांनी व विविध संस्थांनी तिच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव करून तिच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.