चीन मुद्दयांवरील सर्व पक्षीय बैठकीत शरद पवार यांनी मोदींना 'हा' दिला सल्ला Sharad Pawar

Sharad-pawar-narendra-modi-on-China
Sharad Pawar या बैठकीत सर्व प्रथम गलवान खोऱ्यातील शाहिद झालेल्या भारतीय जवावांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या बैठकीसाठी सर्व राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते. काँगेस कडून सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, टीएमसीकडून ममता बॅनर्जी यांच्या सह 20 प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत आम आदमी पार्टी आणि आरजेडी पक्ष उपस्थित नव्हते. या वेळी सर्व पक्षाच्या नेत्यांनी चीनला धडा शिकवावा यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन दिले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी चीन ने सीमा भागात लष्कराची ताकद वाढवली आहे. पूर्व लडाख सीमा भागात चीनने लक्ष केंद्रीत केले आहे. तसंच गलवान खोऱ्यात मोठ्या प्रमाणात चीन ताकद वाढवत आहे. या सर्व बाबींचा विचार करता हा वाद मुत्सद्दीपणाने हाताळावा. असा सल्ला मोदींना दिला आहे.

शरद पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सीमाभागात कोणीही घुसले नसून आपली कोणतीही पोस्ट शत्रूच्या ताब्यात नाही. लडाखमध्ये आपले 20 वीर जवान शहीद झाले. मात्र, ज्यांनी भारत मातेकडे डोळे करुन पाहिलं त्यांना धडा शिकवून ते गेले. डेप्लॉयमेंट, कारवाई आणि प्रत्युत्तर देण्यासह देशाच्या संरक्षणासाठी जे करायला हवं ते आपलं सैन्य करत असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

गेल्या ६ वर्षापासून देशाच्या सीमांच्या सुरक्षेच्या मुद्दय़ावर ही तिसरी सर्वपक्षीय बैठक होती. तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली या दोन्ही बैठका घेण्यात आल्या. पण चीनच्या मुद्दय़ावर मोदी स्वत: बैठकीचे अध्यक्ष होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.