विशाल भालेराव
सिंहगड- मोसे बुद्रूक (ता.वेल्हे)ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शिवाजी गोरे यांची बिनविरोध निवड झाली.मावळत्या उपसरपंच गंगूबाई मरगळे यांनी राजिनामा दिल्याने उपरपंच पदाची जागा रिक्त झाली होती.
सरपंच सारिका पासलकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार (दि.१९) निवडणूक प्रकिया पार पडली.निवडणूकीचे कामकाज ग्रामसेवक सुधिर घोटाळे यांनी पाहीले.मोसे बुद्रूक ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी शिवाजी गोरे यांची एकमताने निवड केली.यावेळी सरपंच सारिका पासलकर, ग्रामसेवक धीरज घोटाळे, माजी उपसरपंच गंगूबाई मरगळे,मारुती पासलकर, माजी सरपंच बबन मरगळे, संदीप मरगळे, किसन बावधने, सुनील गोरे, अंकुश मारणे, लहू मारणे, ओंकार मरगळे, शिपाई वैभव पासलकर आदी उपस्थित होते.