विशाल भालेराव
सिंहगड टाईम्स - सिंहगड रत्न समितीच्या वतीने जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजाविणाऱ्या खानापूर आरोग्य केंद्रामधील सुमारे ३३ कोरोना योद्धयांचा पुजा पारगे यांच्या हस्ते सिंहगड रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रत्येक कोरोना योद्ध्याचे मनोबल वाढविण्यासाठी कोविड योद्धा सन्मानपत्र बहाल करण्यात आले.
"आपल्या सर्व आशा वर्कर्स, डाॅक्टर, सफाई कर्मचारी यांचे काम खुप सुंदर पध्दतीने चालु आहे. असे काम पुढे चालू ठेवा तुम्हाला काही आडचणी आल्यास मला फोन करा मी सैदव आपल्या पाठीशी आहे". पुजा पारगे- सभापती महिला व बालकल्याणआरोग्य, वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवेतील हे कर्मचारी अहोरात्र कोरोनाच्या बचावासाठी आहेत. मात्र, या योद्ध्यांमुळेच आपण आपल्या घरी सर्व सुखी आणि सुरक्षित आहोत, अशी भावना ठेवून सिंहगड रत्न पुरस्कार समितीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत त्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी सत्कारमूर्तींमध्ये आश्विनी पाटील, गैरव हजारी, अदित्य धारूरकर, योगेश पोकळे, मनिषा पंडित, सन्ना तांबोळी, सुरेखा वाडकर, सुनिता जव्हेरी, स्वाती केंदुरकर, रेश्मा सपकाळ, पदमाकर मते, अनिल अभ्यंकर, सुजित राऊत, वैशाली मानकर, अर्चना जाधव, विलास कोंडे, प्रमिला रणधीर, अलका लच्चान, साधना यादव, दिपाली काळोखे, आशा चव्हाण, नीता जाधव, सारिका भोसले, जयश्री सांबरे, सुवर्णा जोरी, गिता पवार, चंदना निवंगुणे, रेश्मा गावडे, विद्या कुरणे, वैशाली तांबे,आरती तांबे, आरती कोडीतकर, अनिता जाधव, रजनी सुपेकर आदींना सन्मानित करण्यात आले. सन्मान पत्र बहाल करण्यात आले या वेळी दीक्षा पारगे उपस्थित होत्या.
स्वतःचे कर्तव्य निभावण्याचा क्षण असल्याचे मानून मी आम्ही केले. आमच्या कामाची पावती म्हणून सिंहगड रत्न समितीने सभापती पुजाताई नवनाथ पारगे यांच्या हस्ते आमचा सन्मान केला. त्याने आमचे मनोबल वाढले. खूप आनंद झाला.'' डाॅ.आश्विनी पाटील