कोणत्याही प्रश्नावर आत्महत्या हा पर्याय नाही.
गेल्या काही दिवसांत आत्महत्येच्या बातम्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. वेगवेगळ्या कारणांनी तरूण आत्महत्या करून आपलं जीवन संपवून घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ट्विट करून तरूणांना कानमंत्र दिला आहे.प्रत्येकापुढं वेगवेगळे प्रश्न आहेत, पण त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. आज आत्महत्येचं प्रमाण वाढत असल्याचं आकडेवारीवरुन दिसतंय. याचं स्पष्ट कारण कळत नसलं तरी आपण अंदाज लावू शकतो. पण कोणत्याही प्रश्नावर आत्महत्या हा पर्याय नाही. ही गोष्ट सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसांत आत्महत्येच्या बातम्या वाढल्यात. कोरोनामुळे आपण काही पावलं मागे आलो हे मान्य आहे. पण याचा अर्थ सर्व संपलं असा नाही. नव्याने सुरवात करुन पुन्हा झेप घेऊ, असा दिलासादायक मेसेज रोहित पवार यांनी दिला आहे.
माझी सगळ्या तरूणांना एक विनंती आहे की कुणीही आत्महत्येचा विचार करू नये. लक्षात घ्या, झेप घेण्यासाठी वाघही दोन पावले मागं येत असतो, असं उदाहरण देत रोहित पवारांनी तरूणांना आत्महत्येच्या विचारांपासून दूर जाण्यास सांगितलं आहे.