खडकवासला विधानसभा मतदार संघातील अडचणींबाबत सुळे यांची अजितदादांशी चर्चा

Sule-discusses-with-Ajit-Dada-about-the-problems-in-Khadakwasla-assembly-constituency
विशाल भालेराव
सिंहगड टाईम्स-, दि. २२ - खडकवासला विधानसभा मतदार संघातील  विविध समस्या व त्यावरील उपाय योजनासाठी काय नियोजन करता येतील यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मुंबई येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि निवेदन दिले.

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष (ग्रामीण) त्रिंबक मोकाशी यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मतदार संघातील अपूर्ण रस्त्यांची कामे, पाणी पुरवठा, ड्रेनेजलाईन तसेच विद्यमान लॉकडाऊन कालावधीतील शालेय मुलांच्या अडचणी, बाजार पेठा आणि दैनंदीन कामकाज बंद असल्याने नागरिकांची होत असलेली गैरसोय याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करून मार्ग काढण्याबाबत विनंती करण्यात आली. याबरोबरच खडकवासला मतदार संघातील विविध विकास योजनांसाठी पुरेसा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार योग्य मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिल्याचे सुळे यांनी सांगितले. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे आदी उपस्थित होते.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.