चढ्या दराने विक्री करणा-या दुकान दारावर कारवाई करा-पत्रकार विशाल भालेराव

सिंहगड परिसरात 'संचारबंदीच्या काळात गैरफायदा घेऊन ग्राहकांकडून जादा रक्कम आकारणाऱ्या आणि चढ्या भावाने वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर सरकारच्या आदेशान्वये कारवाई करण्यात येणार आहे. आशी तहसिलदार यांनी पत्रक प्रसिध्द केले होते . यामु‌ळे कोणीही चढ्या दराने जीवनाश्यक वस्तूंची विक्री करू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल,' असा इशारा सर्व  तहसीलदारांनी  दिला.काही भागात लाॅकडाऊन शिथिल आला आहे. तरी सुध्दा काही किरकोळ विक्री करणारे दुकानदार जादा दराने मालाची विक्री करत आहेत. आता 'व्यापाऱ्यांनी दुकानाच्या दर्शनी भागात दर फलक लावावेत. आणि वाजवी दराने मालाची विक्री करावी. असे आदेश तालुक्यातील दुकानदारांना देण्यात आले आहेत. राज्य सरकारने 'करोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १३ मार्चपासून लागू केला आहे. या अंतर्गत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याबाबत आदेश दिले आहेत.
g
 या दरम्यान काही दुकानदार चढ्या भावाने वस्तूंची विक्री करीत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर तहसील कार्यालयाच्या वतीने  तालुक्यातील सर्व घाऊक व किरकोळ किराणा मालाचे व्यापारी यांना पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. दुकानात आलेल्या ग्राहकांना ठळकपणे दिसतील अशा दर्शनी भागात दर फलक लावावेत; किराणा माल, वस्तू यांची वाजवी दराने विक्री करावी, ग्राहकांकडून कोणत्याही प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५६ व ५८ तसेच भारतीय दंड संहिता कलम १८८ प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे पत्रकाद्वारे सांगण्यात आले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.