हिंदु मुस्लिम सामाजिक एक्यात तेढ निर्माण करणाऱ्या न्यूज अँकर विरोधात कारवाई व्हावी - तनवीर शेख

Tanvir shaikh
अखंड भारतात लोकप्रियता असणाऱ्या अजमेर शरिफचे सुफी संत ख्वाजा गरीब नवाज मोईनुद्दीन चिश्ती (रहे.) यांबद्दल अपमानजनक विधान करणाऱ्या न्यूज इंडिया १८ चा न्यूज अँकर अमिष देवगण विरोधात तक्रार नोंदवण्यात आली.

दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या हेतूने त्याने पूर्ण विवेक बुद्धीने हे वक्तव्य केले आहे, त्यांचा ह्या वक्तव्याची क्लिप इंटरनेट वर उपलब्ध आहे, तरी भाविकांच्या भावना दुखावल्या कारणाने त्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा - तनवीर शेख

न्यूज इंडिया १८ या चॅनल वर मंगळवार दिनांक 16 जून 2020, संध्याकाळी ७.३० च्या दरम्यान आर पार ह्या कार्यक्रमांतर्गत न्यूज अँकर अमिष देवगणने हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक मानले जाणारे सुफी संत ख्वाजा गरीब नवाज ह्यांचा लुटेरा चिष्ती असा एकेरी व अपमानजनक चिश्ती करून समस्त चिष्ती प्रेमिंच्या भावना दुखावल्या आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्यावर कोणतेही पुरावे नसताना चुकीचे आरोप ही केले आहेत.

यावेळी खडकवासला मतदार संघाचे अल्पसंख्यांक अध्यक्ष आरिफ भाई सय्यद, झीशान भाई कुरेशी, सोहेल भाई शेख व अरमान शेख उपस्थित होते.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.