अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील अक्षय बाबाराव गडलिंग हा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा गरीब विद्यार्थी. जिद्द व चिकाटीच्या जोरावर अधिकारी बनला आहे. अक्षय हा लहानपणापासूनच अत्यंत हुशार आहे. त्याने वादविवाद स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धेत या आधीही आपली चमक दाखवली आहे. परंतु वेगळं काहीतरी करण्याची जिद्द असलेल्या अक्षयने प्रशासकीय अधिकारी होण्याचा निर्धार केला होता.
परिस्थिती अत्यंत बेताची असताना अक्षयचे वडील बाबाराव गडलिंग हे गेल्या 40 वर्षांपासून भंगार व रांगोळी विक्रीचा व्यवसाय करत आहे. या व्यवसायावरच ते संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. गरीबीची चणचण अक्षयला भासू नये, यासाठी वडिलांनी अक्षयला अभ्यासासाठी कुठलीच कमतरता होऊ दिली नाही. धेय्यवेड्या अक्षयने अधिकारी होण्याचे स्वप्न उराळी बाळगलं आणि ते सत्यात उतरवलं आहे. अक्षयनं स्वप्नाला आपल्या परिश्रमाची जोड देवून आज वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण करत तो नायब तहसीलदर बनला आहे.
आपल्या गरीबीचं भांडवल न करता अक्षयने वाचनालयात बसून अभ्यास केला. आज अक्षयच्या जिद्द, चिकाटी व परिश्रमासमोर गरीबीला देखील झुकावं लागलं आहे. अक्षयच्या यशाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आदर्श उभा केला आहे. अक्षयने शाळेच्या वाद-विवाद स्पर्धा, वकृत्व स्पर्धा व इतर स्पर्धेत भाग घेऊन प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सुद्धा पटकावलं आहे.