प्रायव्हसी सेटिंग्समधील लास्ट सीन, ऑनलाईन फिचरवर परिणाम; व्हॉट्स अॅपमध्ये बग आल्यानं समस्या (Software Bug)
व्हॉट्स अॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅप वरील लास्ट सीन बंद झाल्यानं अनेकांनी सेटिंग्समध्ये जाऊन त्यात बदल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक अडचणीमुळे सेटिंग्स बदलता येत नसल्याचा अनुभव अनेकांना आला. 'फेल्ड टू अपटेड प्रायव्हसी सेटिंग्स. प्लीज ट्राय अगेन लेटर' असा मेसेज सेंटिग्स बदलताना येत आहे. ही समस्या नेमकी कधीपासून निर्माण झाली आणि ती कधीपर्यंत सोडवली जाईल, याबद्दल अद्याप तरी व्हॉट्स अॅपनं कोणतीही अपडेट्स दिलेली नाही.
व्हॉट्स अॅपमध्ये आलेल्या बगमुळे अॅप अनइन्स्टॉल केलेल्या किंवा त्यामधून लॉग आऊट केलेल्यांना लॉग इन करताना अडचणी येत असल्याची माहिती व्हॉट्स अॅप बिटा इन्फोनं दिली. व्हॉट्स अॅपशी संबंधित अनेक नव्या फिचर्सची माहिती देण्याचं काम ही व्हॉट्स अॅप बिटा करते. अनेकांनी सोशल मीडियावर लास्ट सीन, ऑनलाईन स्टेटस दिसत नसल्याच्या तक्रारी मांडल्या आहेत. भारतासह, अमेरिका, ब्रिटन आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये ही समस्या जाणवते आहे.