सिंहगड कॉलेज येथे पन्हाळा होस्टेलवर कोरोना बाधितांची होतेय गैरसोय - अश्विनी खाडे

Ashwini khade
पुणे शहरातील कोरोना ग्रस्तांची संख्या वाढल्याने नैसर्गिकरित्या, सर्व कोरोना संशयित व्यक्तींना वेगळे ठेवणे आवश्यक असल्याने पुणे महापालिका प्रशासनाने सिंहगड महाविद्यालयाच्या पन्हाळा वसतिगृहमध्ये त्यांची सोय केली आहे. अचानक वाढलेली  काॅरटाईन होण्याची संख्या आणि व व घरी सोडण्यात येणाराची संख्या कमी जास्त होत आहे.

अश्या परिस्थितीत काॅरटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींनी असे सांगितले की त्यांना नियमितपणे अन्न दिले जात नाही, ज्यामुळे विशेषत: मुलांच्या समस्या येत आहेत. जेवण न करता, आमचे मुले रडत असतात - परंतु आम्ही त्यांच्या पुढे जाऊ शकत नाही आणि त्यांच्यासाठी अन्न मिळवू शकत नाही. यामधील काही संशयित रुग्णांचे म्हणणे आहे की, आम्हाला जेवणामध्ये सकस आहार भेटत नसून त्यामुळे आमची रोगप्रतिकारक शक्ती वाढणार नाही, याची दखल घेऊन अश्विनी खाडे  मा. अध्यक्षा राष्ट्रवादी युवती काँग्रेस पुणे यांनी महापौर मुरलीधर मोहळ यांना मेल द्वारे ऑनलाईन पद्धतीने निवेदन दिले. त्यानंतर थोड्याच वेळात महापौरांनी फोन करून योग्य ती खबरदारी घेतली जाईल असे सांगितले. या कामी दीपक मते- सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा यांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.