चीनला दणका; केंद्र सरकारने टिकटॉक आणि यूसी ब्राउझरसह ५९ चीनी Apps'वर बंदी.

ban-Tickeck-and-UC-Browser
भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनला झटका, भारत सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी ऍप्सवर घातली बंदी आहे. टिकटॉकसह युसी ब्राउजर, कॅम स्कॅनरसह आणखी अनेक लोकप्रिय ऍप्सवर भारताने बंदी घातली आहे. याआधी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी चायनीज अॅप्स एक यादीच तयार केली होती. केंद्र सरकारने या ऍप्सपवर बंदी घालावी किंवा हे अॅप मोबाइलवरून तात्काळ हटवण्यास नागरिकांना सांगावे, असं यंत्रणांनी सरकराला कळवलं होतं. यानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ५९ चिनी ऍप्सवर बंदी घातली आहे


बंदी घातलेल्या ऍप्सविरोधात अनेक तक्ररी येत होत्या. हे ऍप्स देशाचे सार्वभौमत्व, सुरक्ष आणि अखंडतेसाठी घातक बनत चालले होते. चीन या ऍप्सद्वारे भारतीयांच्या डेटाशी छेडछाड करू शकत होता. यामुळे भारताच्या गुप्तचर संस्थांनी धोकादायक ऍप्सची यादी तयार करून ती केंद्र सरकारला आधीच दिली होती. यानंतर केंद्र सरकारने आपल्या स्तरावर या अॅप्सची माहिती घेतली. हे अॅप्स धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर केंद्र सरकारने त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

बंदी घातलेल्या ऍप्सविरोधात माहिती तंत्रज्ञान विभागाकडे अनेक तक्ररी येत होत्या. हे अॅप्स  देशाचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि अखंडतेसाठी घातक बनत चालले होते. चीन या ऍप्सद्वारे भारतीयांच्या डेटाशी छेडछाड करू शकत होता. यामुळे भारताच्या गुप्तचर संस्थांनी धोकादायक अॅप्सची यादी तयार करून ती केंद्र सरकारला आधीच दिली होती. यानंतर केंद्र सरकारने आपल्या स्तरावर या अॅप्सची माहिती घेतली. हे अॅप्स धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर केंद्र सरकारने त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

भारतात युट्यूबहून अधिक युजर्स हे टिकटॉक ऍप्सचे आहेत. टिकटॉकचे जवळपास २० कोटी युजर्स असल्याचं सांगण्यात येतंय. तर हेलो अॅपचे भारतात ४० हजार युजर्स आहेत. वुई मेट, शेअर इट, युसी ब्राउजर्स, क्लब फॅट्री, युसी न्यूज, झेंडर, लाइक, सीएम ब्राउजर्स, शीन, न्यूजडॉग, वंडर कॅमेरा, कॅम स्कॅनर, क्लिन मास्टर-चिता मोबाइल, फोटो वंडर, क्यूक्यू प्लेअर, स्वीट सेल्फी, हेलो, यू व्हिडिओ, मोबाइल लेजंड्स अशा एकूण ५९ अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे

जाहिरात




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.