सिंहगड टाईम्स - महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणावर शरद पवारांना केवळ राजकारण करायचे आहे. आजपर्यंत अनेक बहुजन समाजावर पवारांनी अत्याचार केले. हे नेतृत्व राज्याचे असू शकत नाही. त्यामुळे शरद पवारच महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर येथे केली त्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला विधानसभा ग्रामीण मतदार संघात पडळकर विरोधात राष्ट्रवादीकडून त्र्यंबकअण्णा मोकाशी यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असून विविध पोलीस स्टेशनमध्ये पडळकरांविरिद्ध निवेदन देण्यात आलेली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खडकवासला मतदार संघ पुणे (ग्रामीण)च्या वतीने राष्ट्रीय नेते आ. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर बेतालपणे जाहीर वक्तव्य करणाऱ्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी उत्तमनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी.आय.श्री सुनील पंधारकर साहेब यांना मा. त्रिंबक आण्णा मोकाशी, अध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खडकवासला मतदारसंघ पुणे (ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले असून पडळकरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे
तसेच पोलीस निरीक्षक समीर कदम खेडशिवापूर पोलीस स्टेशन यांना पडळकर यांच्या विरोधात निवेदन देण्यात आले असून या वेळी सयद आरिफ, सुनील वनपत्रे, राजेंद्र पवार, अविनाश हवालदार श्रीकांत पवार राजेंद्र कोंडे, शहाजी पवार, अभय कोंडे, नाना धोंडे, राजू मुजावर, अजित कोंडे , रघुनाथ शिर्के, लक्ष्मण हवालदार, सचिन हवालदार, बाळासो मुजुमले, अशोक गोगावले, विशाल भालेराव, मधुकर शिरोळे, जिशांत कुरेशी, ताज शेख आदी उपस्थित होते.
एके वेळी धनगर समाजाला आव्हान करणारे गोपीचंद पडळकर की मी वाचत गेलो. तर मला मतदान करू नका आणि आत्ता बीजेपी मध्ये जाऊन डिपॉझिट जप्त करून घेऊन पुन्हा मागून आमदार झाले .त्यांनी आपली काय औकात आहे ते ओळखावे. गोपीचंद्र पडळकर तुझी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सावलीपाशी उभ रहाण्याची पण लायकी नाही. जरा तोंड सांभाळुन बोला आणि साहेबांची माफी मागा. त्रिंबकअण्णा मोकाशी - अध्यक्ष खडकवासला विधानसभा मतदार संघ ग्रामिण