आयुक्‍त तुकाराम मुंढेंनी पीपीई किट घालून थेट कोरोनाबाधितांना दिला धीर

Commissioner-Tukaram-Mundhe-wears-PPE-kit-and
अनलॉक झाल्यापासून कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोच आहे. त्याबरोबरच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युची संख्याही वाढतीच आहे. प्रशासन आपल्यापरीने ही संख्या कमी करण्याचा प्रयत्न करीत असले तरी शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आणि मृतांच्या आकड्यामुळे महापालिका प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. या पार्श्‍वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता थेट कोरोनाबाधितांना मिळणाऱ्या उपचाराचीच पाहणी केली. त्यांनी पीपीई किट घालून मेयो व मेडिकल येथील कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता थेट कोरोनाबाधितांना मिळणाऱ्या उपचाराचीच पाहणी केली. त्यांनी पीपीई किट घालून मेयो व मेडिकल येथील कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.

थेट रुग्णांशी चर्चा
शहरात तीन हजारांवर कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील 1 हजार 132 रुग्ण मेयो, मेडिकलमधील कोविड हॉस्पिटल तसेच इतर कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. बाधितांच्या सतत वाढत्या आलेखामुळे आयुक्त मुंढे यांनी नुकताच मेयो, मेडिकलचा दौरा केला. थेट रुग्णांपर्यंत जाण्यासाठी त्यांनी मेडिकल व मेयो रुग्णालयाने दिलेली पीपीई किट परिधान केली. पांढऱ्या रंगाची पीपीई किट घालून त्यांनी थेट रुग्णांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी येथे मिळणाऱ्या सुविधांबाबत विचारणा केली. बाधितांशी चर्चा करताना त्यांना धीरही दिला.

कामाचे कौतुक
मेडिकल व मेयोतील डॉक्‍टरांशी चर्चा करीत त्यांच्या कामाचे कौतुक केले. रुग्णांना उत्तम उपचार देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी त्यांच्यासोबत मेडिकल तसेच मेयोतील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाधितांना देण्यात येत असलेल्या उपचारासंबंधी आयुक्तांना माहिती दिली.

जाहिरात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.