पुणेकरांना लॉकडाउनमधून एकदिवसासाठी दिलासा, जाणून घ्या काय केलाय बदलं

Consolation-to-Punekar-for-one-day-from-lockdown-find-out-what-has-been-changed
करोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी पुण्यात पुन्हा एकदा कठोर लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात दहा दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली होती. त्यानुसार पुण्यात १४ जुलैपासून जीवनावश्यक वस्तुंची, किरकोळ, मटन, चिकन, मासे, अंडी विक्रीची सर्व दुकाने बंद होती.

पण उद्या रविवारचा एकदिवस नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करता यावी यासाठी लॉकडाउन थोडा शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या जीवनावश्यक वस्तुंची, किरकोळ, मटन, चिकन, मासे, अंडी विक्रीची सर्व दुकाने सकाळी आठ ते संध्याकाळी सहापर्यंत चालू राहणार आहेत.

त्यासंबंधीचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत. फक्त एक दिवसासाठी ही सवलत देण्यात येणार आहे. सुरक्षित अंतर राखून नियमांचे पालन करुन नागरिकांनी खरेदी करावी असे आदेशामध्ये म्हटले आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.