खडकवासला गावात कोविड सेंटर सुरू करण्याची दिपक मते यांची त्रिंबकअण्णा मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली मागणी

Demand-deepak-mate-start-Covid-center-in-khadakwasla
विशाल भालेराव
खडकवासला (सिंहगड टाईम्स):खडकवासला गावामध्ये वेगाने वाढत असलेल्या कोरोनाने खडकवासला ग्रामपंचायतीमध्येही शिरकाव केल्याने सरपंचासह सदस्य व ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचार्‍यांनाही क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस दिपक मते यांनी त्रिंबकआण्णा मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे खडकवासला गावासाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी केली आहे.


"खडकवासला गावात दररोज कोरोना रुग्ण वाढत आहेत ही चिंतेची बाब असून करोनाला आळा घालण्यासाठी खडकवासला गावातील जिल्हा परिषद शाळेत केव्हीड टेस्ट सेंटर सुरू करण्यात यावे जेणेकरून करून लोकांची गैरसोय होणार नाही, आज रोजी खडकवासला गावातील ६५ ते ७० लोकांनवर उपचार सुरू आहेत. खडकवासला गावातील एक महिला कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे अजून संख्या वाढली जाण्याची शक्यता आहे". दिपक मच्छिंद्र मते- सरचिटणीस,पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस


या कामी अध्यक्ष खडकवासला विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस ग्रामीण त्रिंबकआण्णा मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस दिपक मच्छिद्र मते पाटील निलेश प्रकाश मते उपाध्यक्ष खडकवासला विधानसभा मतदारसंघ,, राष्ट्रवादी कॉंग्रेस सोशल मिडीया व लोकेश रमेश मते व राहुल मुरलीधर मते आदी पाठपुरावा करत आहेत
Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.