किरकटवाडीमध्ये कात्रज दुध डेअरीची फ्रँचाईसी सुरू


Katraj-Milk-Dairy-franchise-started-in-Kirkatwadi
विशाल भालेराव 
सिंहगड टाईम्स: दि.४- किरकटवाडी (ता.हवेली) येथे पानशेत-कुरवटी येथील भिकाजी गायकवाड यांनी कात्रज दुध डेअरीची फ्रँचाईसी विकत घेऊन दुध डेअरीचा व्यवसाय सुरू केला.खाजगी नोकरी मध्ये अधिक मेहनत घेवूनही संसाराचा गाडा हाकणे जिकरीचे होते.त्यामुळे जमेल त्याने उद्योग धंद्यात उतरले पाहीजे.या हेतूने गायकवाड यांनी किरकटवाडी फाटा(ता.हावेली)येथे रविवार दि.४ रोजी वेल्ह्याचे माजी पंचायत समिती सदस्य गणपत गायकवाड यांच्या हस्ते दुध डेअरीचे उद्धघाटन केले.आणि आपल्या व्यवसायला गुरू पौर्णिमाच्या दिवशी सुरूवात केली.या उद्धघाटन समारंभी उपस्थित असणाऱ्या प्रत्येक जणांनी गायकवाड यांच्या दुध डेअरीतून दुध व अन्य दुग्धजन्य पदार्थ विकत घेवून त्यांच्या व्यवसायला शुभेच्छा दिल्या.

यावेळी वेल्हे माजी पं.स.सदस्य गणपतराव गायकवाड, शिक्षक दिलीप कांबळे,उद्योजक संदिप घुले,गोंडेखलचे पोलीस पाटील  तुषार कांबळे, कशेडीचे पोलीस पाटील मारुती रणखांबे, भिमशक्ती युवामंचाचे उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड, यशवंत सेना अध्यक्ष शंकर ढेबे, सचिव दिपक मोरे, संदिप रणखांबे ,राजु कांबळे,रवि मोरे, गवळी करंजावणे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.