विशाल भालेराव
सिंहगड दि.१६ (सिंहगड टाईम्स): खडकवासला गावामध्ये वेगाने वाढत आसलेल्या कोरोनाने खडकवासला ग्रामपंचायतीमध्ये शिरकाव केल्याने सरपंचासह सदस्य व ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचा-यांनाही क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. खडकवासला ग्रामपंचायतीचा एक सदस्य व त्यांची आईचा रिपोर्ट कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे रिपोर्ट पाॅझिटिव्ह येण्याच्या एक दिवस आगोदर झालेल्या ग्रामपंचायतच्या मिंटिगमध्ये तो सदस्य उपस्थित होता. त्यामुळे सरपंच, ग्रामविकास आधिकारी, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य व संपूर्ण कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केले आहे.
मीटिंगमध्ये उपस्थित असलेला सदस्य पाॅझिटिव्ह आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही सर्वांनीच क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तरीही आवश्यक त्या उपाय योजना राबवण्याकरता आम्ही सर्वजण कार्यरत राहणार आहोत. घरातील व्यक्तीना धोका नको म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. गाव वाचवण्यासाठी आम्ही सर्वजण कांही दिवस घराबाहेर राहून काम करणार आहोत. सौरभ मते- सरपंच खडकवासला
खडकवासल्यात गावाचा एकुण रूग्ण आकडा ६३ वर पोहोचला असून त्या पैकी २ रुग्ण पुर्णपणे बरे झाले आहेत. ६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत .तर एका महिलेचा कोरोनाने मृत्यु झाला आहे. आशी माहीती खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्र आधिकारी डाॅ. वंदना गवळी यांच्या कडून देण्यात आली आहे.