करोना पार्श्वभूमीवर गोर्हे बु. ग्रामपंचायतीकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई...

विशाल भालेराव
सिंहगड टाईम्स-हवेली परिसरातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता हवेली प्रशासनाने दुकानदार, व्यापाऱ्यांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वेळ ठरवून दिली आहे, तरीही काही व्यापारी व्यापाऱ्यांकडून या नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या वेळेनंतरही काही दुकानदार आपली दुकाने चालू ठेवून सरकारी नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गोर्हे बु. ग्रामपंचायतीच्या वतीने व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती घेतली असता, गोर्हे बु ग्रामपंचायत व हवेली पोलीस स्टेशन ग्रामीण मार्फत वेळोवेळी दुकानांच्या वेळेसंदर्भात व्यापाऱ्यांना सांगण्यात आले होते परंतु काही व्यापाऱ्यांकडून या नियमांचे पालन होत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून त्यांनी ग्रामपंचायत व हवेली ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या सूचनांचे पालन न केल्याने संबधित व्यापा-यांवर कारवाई करण्यात आली आहे, असे ग्रामसेवक सुनिल खैरनार यांनी सांगितले

करोना प्रदूर्भावापासून बचावासाठी  प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत आपली दुकाने चालू ठेवा प्रशासनाला सहकार्य करा, मास्क शिवाय कोणत्याही ग्राहकाला दुकानासमोर येऊ देऊ नका तसेच सोशल डिस्टन्स चे नियम पाळा, पोलीस निरीक्षक- अशोक शेळके
  

यावेळी हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सरपंच लहू खिरीड, ग्रामसेवक सुनील खैरनार, संतोष फणसे लिपिक व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.