सिंहसगड रोड वरील मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मधून एका दिवसात तब्बल १७ रुग्ण करोना मुक्त

धायरी (सिंहगड टाईम्स)पुणे महानगर पालिकेच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील पहिले कोविड-१९ केंद्र मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल धायरी फाटा येथे सात जुलैपासून कोरोना पेशंटच्या सेवेत रुजू झाले होते. १६ जुलै रोजी १८ कोरोना रूग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये लहान ४ वर्षा वयाच्या बालकापासून ते वय वर्ष ६० पर्यंतच्या रूग्णांचा समावेश आहे.

"सिंहगड रस्ता परिसरामध्ये कुठल्याही खाजगी हॉस्पीटलमध्ये कोविड 19 सेंटर उपलब्ध नाही. रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याकारणाने आमच्या मोरया मल्टी स्पेशलीटी हॉस्पीटलचे 48 बेड पैकी 27 बेड कोविड पेशंटसाठी ठेवण्यात आले. यासाठी पुणे मनपाच्या वतीने दोन व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत.  यापुढे अशीच सेवा आम्ही देत राहू". डॉ. अजित पाटील

 या हाॅस्पिटलमध्ये परिसरातील जवळपास अठरा पेशंट उपचार घेत होते. त्यांना गुरुवारी संध्याकाळी ५ च्या दरम्यान घरी सोडण्यात आले. यावेळी संबधित रुग्णांवर पुष्पवृष्टी आली. यावेळी मोरया मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर अजितसिंह पाटील, डॉक्टर मनीष कोलगे, डॉक्टर राकेश ओसवाल, डॉक्टर श्रधा शिंदे, डॉक्टर ऋतुजा सालेकर, डॉक्टर शामली कडगे व हॉस्पिटल कामगार व पत्रकार, पोलिस उपस्थित होते.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.