भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने खंडणी मागितली जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. यामुळे पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अखेर या प्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी जाहीर भूमिका घेतली असून, खंडणी मागणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही पत्र लिहिले आहे.
माझ्या नावाचा वापर करुन खंडणी मागितल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यासंदर्भात मी सर्व कायदेशीर कारवाई केली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची गंभीर दखल घेऊन तात्काळ संबंधितांस अटक करुन कठोर कारवाई करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच, असे प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी कठोर उपाययोजना करावी, अशी सूचनाही पाटील यांनी केली आहे.
पाटील म्हणाले की, कोरोना महामारीचा सामना करताना, काहीजण याचा गैरफायदा घेत आहेत. पिंपरी-चिंचवड आणि कोथरुडमध्ये २० जुलैला माझ्या नावाने खंडणी मागण्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. माझ्या नावाचा गैरवापर करून खंडणी मागितल्याचे प्रकार होत आहेत. याविरोधात आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तर कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना मी स्वत: पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.
कोरोना महामारीचे संकट आले आहे. देशात आणि महाराष्ट्रात ज्यांच्यावर याचा परिणाम झालेला आहे, अशा गरीब समुदायाला दोन वेळचे जेवण कसे मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. याचबरोबर लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी करणे, पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना रुग्णालय कसे उपलब्ध होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. याचबरोबर लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांसाठी आम्ही कोविड सेंटर उभे करीत आहोत. अशा परिस्थितीत माझ्या नावाने खंडणी मागण्याचे प्रकार घडत आहेत, असे पाटील यांनी नमूद केले.

जाहिरात