या जिल्ह्यात पुढील 15 दिवस ‘नो एन्ट्री’…. ई-पासही केले बंद!

पुढील पंधरा दिवस कोल्हापूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील कोणालाही प्रवेश मिळणार नाही. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांनी यासंबंधीचा आज आदेश काढला आहे. जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी देण्यात येणारे ई-पासही त्यांनी बंद केले आहेत.

कोल्हापुरात सोमवारपासून सात दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही घोषणा केली. त्यानंतर आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील महत्त्वाची घोषणा केली आहे.

कोल्हापुरात येत्या सोमवारपासून म्हणजेच 20 जुलैपासून सात दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. यादरम्यान, सर्व नागरिकांनी या लॉकडाऊनमध्ये प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. लॉकडाऊन दरम्यान कोल्हापुरात फक्त औषध आणि दूध पुरवठाच सुरु राहील, इतर सर्व सेवा शंभर टक्के बंद राहणार आहेत.

कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे नवे रुग्ण आढळत असल्याने थोडीशी चिंता वाढली आहे. या संकटावर लवकरात लवकर मात करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. पण जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून खबरदारी घेणं गरजेचं आहे, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.