अरुण अण्णा गायकवाड यांचा मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा.

विशाल भालेराव
सिंहगड टाईम्स : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणारे बहुजन समाज पार्टीचे पुणे शहर प्रभारी अरुण अण्णा गायकवाड यांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने व मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा केला.

सध्या देश कोरोणासारख्या महामारी चा सामना करत असताना उधळपट्टी न करता सामाजिक मदत करून साजरा करीत आहोत, याचा मला अत्यंत आनंद होत आहे, आज देशात लोक डाऊन असल्यामुळे कामगारांच्या हातांना काम नाही त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे या भावनेतून लॉकडाउनच्या काळात पन्नास ते साठ गरजू कुटुंबीयांना अन्नधान्य कीट, पाचशे मास्क, मतिमंद निवासी शाळेला आर्थिक मदत याचबरोबर परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी जाण्याची सोय करून देण्यात आली.

अरुण अण्णा गायकवाड यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ही मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी फारुख धनकपुरी हिंदू मुस्लीम भाईचारा कमिटी पुणे अध्यक्ष, माधुरी कांबळे आरपीआय पुणे शहर उपाध्यक्ष, प्राध्यापक विक्रम कसबे ज्ञान गंगोत्री मतीमंद निवासी शाळेचे संस्थापक अध्यक्ष, सोमनाथ पोकळे वादळ ग्रुप, नवनाथ कांबळे अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान, सिद्धार्थ राजेगावकर भीम आर्मी युवा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, सतीश जावळे एस पी ग्रुप, योगेश पासलकर हमराज ग्रुप, हेमंत आडगळे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.