मालखेड गावात ६९ वर्षाची व्यक्ती अढळून आली करोना पाॅजेटिव्ह.

विशाल भालेराव
सिंहगड-हवेली तालुक्यातील मालखेड गावात कोरोनाचा रूग्ण आढळून आल्याने मालखेड परिसरात राहणा-या नागरिकांना घरी जाऊन खानापूर आरोग्यकेंद्राच्या कर्मचारी, आरोग्य सेवक, नर्स, आशा वर्कर्स तपासणी करत आहेत. ग्रामपंचायत मालखेडचे ग्रामसेवक नवनाथ झोळ,पोलीस पाटील सुप्रिया जोरी , खानापूर आरोग्यकेंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डाॅ आश्विनी पाटील यांनी गावांतील नागरिकांना योग्य सुचना देण्यात आल्या आहेत.

"घाबरून जायचे काहीच कारण नाही आवश्यक ती काळजी घ्यावी,  प्रशासनाने दिलेले नियम पाळावे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, मास्कचा आणि सोशल डिस्टन्स चे नियम पाळा'.  पोलीस निरीक्षक अशोक शेळके

मालखेड गावातील एकोणसत्तर वर्षाच्या व्यक्तीचा पाॅजेटिव्ह रिपोर्ट नुकताच खानापूर आरोग्यकेंद्र केंद्राकडे प्राप्त झाल्याचे समजते. कोरोना झालेल्या व्यक्तीच्या घरातील व परिसरातील तीस जणांना होमकाॅरटाईन शिक्का आज मारण्यात आला आहे तसेच  मास्क होमिओपॅथीक औषधाचे वाटप करण्यात आली. गावात सर्व ठिकाणी फवारणी करण्यात आली. कोरोना झालेल्या व्यक्तीला नवले हाॅस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. हवेली पोलीस स्टेशन ग्रामीणचे पोलीस निरीक्षक यांनीही नागरिकांना योग्य मार्गदर्शन करून सुचना दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.