जागतिक दिव्यांग क्रिकेटचे जनक स्व.पद्मश्री अजित वाडेकर सर यांना अनोखी श्रध्दांजली.
0
शुक्रवार, ऑगस्ट १४, २०२०
पुणे-श्री वाडेकर सरांच्या प्रेरणेनेतुन व AICAPC ही संस्था दिव्यांग खेळाडूंसाठी अविरत कार्य करत आहे. याचीच प्रचिती म्हणुन मागील वर्षी दि.13/08/2019 रोजी इंग्लंड येथे पार पडलेल्या जागतिक दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत (भारत,पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश,इंग्लंड) भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला. याच विजयाची प्रेरणादायी आठवण म्हणुन प्रितम ग्रूप चे सर्वेसर्वा श्री गजानन गंजेवार यांच्या तर्फे शिवापूर गावातील 20 विध्यार्थी आणि दिव्यांग खेळाडु यांना शालेय उपयोगी साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
या प्रसंगी शिवापूर गावाचे उपसरपंच श्री आण्णा दिघे,ग्रामसेवक श्री विजय गरुड भाऊसाहेब,राष्ट्रीय दिव्यांग खेळाडु व मार्गदर्शक श्री राजु मुजावर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी पत्रकार श्री किरण दिघे यांनी उपस्थितांना माहिती व मार्गदर्शन केले. उपसरपंच आण्णा दिघे यांनी ऑल इंडिया क्रिकेट असोसियेशन फॉर फीजीकली चेलेंज,मुंबई. इंडिया या संस्थेला शुभेच्छा देत दिव्यांग क्रिकेट असोसियेशन पुणे जिल्हा या संस्थेचे कौतुक केले. श्री राजु मुजावर यानी आभार मानले.संकल्पना सौजन्य -श्री गजानन गंजेवार, प्रितम ग्रुप.आयोजक-सौ सायली पोंक्षे,अध्यक्ष दिव्यांग क्रिकेट असोसियेशन पुणे जिल्हा.शुभेच्छा-ग्रामपंचायत शिवापूर व ग्रामस्थ.