धायरी येथे रुद्र प्रतिष्ठानकडून यंदा रक्तदानाची दहीहंडी साजरी, ३५ गोविंदानी केले रक्तदान

 

धायरी: दहीहंडीच्या दिवशी गोविंदा पथक थरांवर थर लावण्यास निघतात. यंदा मात्र कोरोनामुळे यात खंड पडला आहे. परंतु, दहीहंडी पथकांनी समाजभान राखून विविध उपक्रम राबवून हा सण साजरा करण्याचा निर्धार केला आहे. रुद्र प्रतिष्ठान कडून  यंदा रक्तदानाची दहीहंडी साजरी करण्यात आली आहे. या बाबत सुमित बनकर  यांनी याबात माहिती दिली.


करोनाच्या प्रादुर्भावामुळे रुद्र प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी आयोजित केला जाणारा दहीहंडी उत्सव यावर्षी रद्द करण्यात आला व सामाजिक बांधिलकी जपत रुद्र प्रतिष्ठान च्या वतीने रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी यावर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ३५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार घालून करण्यात आली या कार्यक्रमाला धायरी गावच्या माजी सरपंच सौ.आशाताई सुनील बेनकर या प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होत्या 


या कार्यक्रमाचे आयोजन सुमित सुनील बेनकर सागर साष्टे, संभाजी पुरी व प्रवीण वाघमारे यांनी केले होते या वेळी रुद्र प्रतिष्ठान चे युवराज साष्टे, सनी मानकर, दादा शिंदे, यश साष्टे, सुनील पुरी, संदीप मोहिते, सूरज डमकले, योगेश शेंडकर, शुभम पाटील, गणेश सरकार, निलेश सरकार, अमोल सरोदे, महादेव जाधव हे कार्यकर्ते सहभागी झाले होत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.