विशाल भालेराव
न्हरे: २८ (सिंहगड टाईम्स) आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या खडकवासला हवेली भागातील सिंहगड इन्स्टिट्युट टेक्निकल कॅम्पस, न्हरे येथे कोविड केअर सेंटरला भेट दिली. खडकवासला राष्ट्रवादी ग्रामीण अध्यक्ष त्रंबकअण्णा मोकाशी यांनी खडकवासला ग्रामीण भागातील नागरिकांची करोना प्रदुभावामुळे त्रास होऊ नये यासाठी खडकवासला ग्रामीण भागासाठी स्वतंत्र कोविड केअरची मागणी केली होती, कोविड केअर सेंटरला भेट देऊन खासदार सुप्रिया सुळे यांनीभेट देऊन रुग्णांच्या सोयी सुविधांची विचारपूस व व्यवस्थेबद्दल पाहणी करून आढावा घेतला.
सिंहगड इन्स्टिटय़ूट टेक्निकल कॅम्पस, न्हरे येथे कोविड केअर सेंटर मधील रुग्णालयातील कोविड वार्डाची पाहणी, ऑक्सिजन व आदी उपकरणांची माहिती तसेच पूर्ण हॉस्पिटलची व इमारतीची पाहणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. औषधोपचार, साफसफाई, भोजन, डॉक्टरांचा व्यवहार याबाबत त्यांनी रुग्णांशी संवाद साधला. या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून सर्व डॉक्टर, नर्स, हॉस्पिटल स्टाफ यांचा प्रोत्साहनपर छोटेखानी सत्कार करून त्यांच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जि.प. सदस्या भूमकरताई, नगरसेवक सचिन दोडके, खडकवासला राष्ट्रवादी मतदारसंघ अध्यक्ष काका चव्हाण, खडकवासला राष्ट्रवादी ग्रामीण अध्यक्ष त्रिंबकअण्णा मोकाशी, पुणे राष्ट्रवादी महिला अध्यक्षा स्वाती पोकळे, पंचायत सदस्य ललिता कुटे, सुप्रिया भूमकर, हवेली गटविकास अधिकारी श्री. शिक्रे साहेब, आरोग्य प्रमुख डॉ वंदना गवळी मॅडम, डॉ. आहेर सर, तहसीलदार बाराटक्के मॅडम, सरपंच पोपट खेडेकर, आदि उपस्थित होते.