विशाल भालेराव
धरण परिसरात पावसाचा जोर चांगला राहिल्याने खडकवासला धरण ९० टक्क्यांपेक्षा जास्त भरल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, बुधवारी दिवसभरात ४८० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. हा विसर्ग जास्त प्रमाणात नसला तरी आपत्ती व्यवस्थापनाने आपली यंत्रणा सतर्क आहे. पाऊस सतत राहिल्यास मुठा नदीमध्ये आणखी पाणी सोडले जाणार असल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.
खडकवासला धरण ९० टक्के पेक्षा जास्त भरल्याने राष्ट्रवादी खडकवासला मतदार संघाच्या वतीने मनपा विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांच्या हस्ते खडकवासला धरणाचे ओटीभरण करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी खडकवासला ग्रामीण मतदार संघाचे अध्यक्ष त्रिंबक आण्णा मोकाशी, नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने उपसरपंच अश्विनी ताई मते, पुनम मते, अजय मते, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक सरचिटणीस दिपक मच्छिंद्र मते पाटील, ग्रामविकास अधिकारी हेगडे साहेब, पाठबंधाऱ्याचे अधिकारी भागवत साहेब, किरण मते, अतुल पवार, मोहन मते आदी उपस्थित होते.