"रेड लाईट" एरियातील महिलांना मदतीचा हात देवून मदर टेरेसा यांना राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस पुणे यांच्याकडून अभिवादन


पुणे:(सिंहगड टाईम्स) इच्छा नसतानाही परिस्थितीमुळे अवहेलना सहन करीत त्या वाईट ठिकाणी नाईलाजास्तव राहणाऱ्या "रेड लाईट" एरियातील महिलांना आपुलकीने विचारपूस करीत त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. आयुष्यभर दुःखी कष्टी, आजारी व समाजाने नाकारलेल्या घटकांसाठी कार्य करणाऱ्या नोबल पुरस्काराने सन्मानित केलेल्या संत मदर तेरेसा यांच्या जयंतीनिमित्त या उपक्रमाअंतर्गत अनोख्या विधायक पद्धतीने अभिवादन करण्यात आले.

मदर टेरेसा त्यांनी संपूर्ण भारतात महत्वपुर्ण योगदान देखील दिलं आहे. सामाजिक कार्यात दिलेल्या महत्वपुर्ण योगदानाकरता मदर टेरेसा यांना देशातील सर्वोच्च असा भारत सन्मान देखील मिळाला. पद्मश्री आणि नोबेल पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

 मदर टेरेसा यांच्या जयंती निमित्त रेड लाईट एरियातील महिलांची आपुलकीने विचारपूस करून त्यांच्या अडचणी यावेळी समजून घेण्यात आल्या. तसेच त्यांना जेवणासह त्यांच्या लहान मुलांसाठी दूध, बिस्किट व पाणी बॉटल यांचे देखील वितरण करण्यात आले."त्यांच्या" समस्या सोडविण्यासाठी व त्यांच्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे तसेच मदर टेरेसा यांच्याकडुन प्रत्येकाने प्रेरणा घेण्याची गरज आहे असे अश्विनी परेरा, अध्यक्ष्या - राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस पुणे यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उपाध्यक्ष सुषमा सातपुते यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. या अनोख्या उपक्रमात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अक्षदा राजगुरू, योगिता बावकर,प्रेमा पाटोळे, श्रद्धा जाधव, नंदिनी बडदे,  सुहानी सोनवणे, अमृता मुळे यांनी सहभाग घेतला. युक्रांदचे सुदर्शन चखाले व सागर घोलप यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.