विशाल भालेराव
हवेली ग्रामीण, ३१ (सिंहगड टाईम्स) यावर्षीची परिस्थिती गेल्या वर्षी पेक्षा खूप वेगळी आहे. करोनामुळे प्रशासनाने काही अटी आणि नियम लागू करून गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी दिली आहे. परंतु शहरात करोना महामारीने थैमान घातले असून दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यादरम्यान सार्वजनिक किंवा घरगुती गणपती मंडळांनी जागेवरच गणपती विसर्जन करायचं आहे. त्यामुळे विनाकारण गर्दी करून नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल अशा इशारा हवेली ग्रामीण पोलीसांकडून देण्यात आला आहे
उद्या दि.1/9/2020 रोजी श्री.गणेश विसर्जन असलेने महाराष्ट्र शासन यांचे नियम नुसार सर्व श्री. गणेशोत्सव मंडळाने कोणत्याही प्रकारचे विसर्जन मिरवणूक न काढता साध्या पद्धतीने विसर्जन करावे. तसेच सर्व नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळावा. कोरोना च्या पार्श्वभूमीवर हवेली पोलीस ठाणे कडून कोणत्याही प्रकारच्या वाद्याला अथवा मिरवणुकीला परवानगी देण्यात आलेली नाही. जे कोणी सदर आदेशाचे पालन करणार नाही. त्यांचे विरुद्ध प्रचलित कायद्यान्वये कारवाई करनेत येईल याची सर्वानी नोंद घ्यावी. विसर्जना बाबत काही शंका किंवा अडचणी असल्यास कृपया पोलीस कॉन्स्टेबल श्री भापकर 9763651728 यांच्याशी मोबाईल नंबर वर संपर्क करावा, तसेच तरी सर्व नागरिकांना व गणेश भक्तांनी यावर्षी आपण गणपती बाप्पांचे विसर्जन घरीच किंवा मूर्ती दान करून करावे असे आवाहन हवेली पोलीस ग्रामीण स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी केले.