गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार हे नाव राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चेत होते. आता पुन्हा एकदा पार्थच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.मात्र यावेळी कोणत्या ट्विटमुळे नाही तर एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला मदत केल्यामुळे पार्थ हे चर्चेत आले आहेत.
जालना जिल्ह्यातील गोरख साबळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांने सोशल मीडियावर एक पोस्ट करून काम करत असलेल्या कंपनीने पीएफ रखडवला असल्यामुळे कौटुंबिक आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. अशा आशयाची पोस्ट केली होती. पार्थ पवार यांनी या पोस्टची दखल घेऊन संबंधित कार्यकर्त्यांशी संपर्क करून मदतीचा हात पुढे केल्याचे दिसून आले.
माझा पीएफ मिळत नसल्यामुळे मी आणि माझे कुटुंबीय प्रचंड आर्थिक संकटात असल्याचे सांगितल्यानंतर पार्थ पवार यांनी लगेच त्याला दहा हजार रुपयाची मदत देऊ केली. व एक-दोन दिवसांमध्ये पीएफ रखडवलेल्या खाजगी कंपनीच्या मॅनेजमेंट सोबत बोलून पीएफ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पार्थ पवार यांच्याकडून देण्यात आले. एरव्ही सतरंज्या उचलणारे सर्वसामान्य कार्यकर्ते खरंच अडचणीत असताना पार्थ पवार यांच्यासारखा युवा नेता कार्यकर्त्याच्या मदतीसाठी धावून येतो तेव्हा नक्कीच कार्यकर्त्याला काम करण्यासाठी दहा हत्तीचं बळ येत असणार.