पुणे:२९ (सिंहगड टाईम्स) राज्यात अनलॉक सुरू झालेले असताना प्रार्थना स्थळे मात्र अद्याप बंद आहेत. त्याच अनुषंगाने राज्यात भाजपच्या वतीने ठीक ठिकाणी घंटा नाद आंदोलन करत सरकारने मंदिर खुली करावीत अशी मागणी करण्यात येत आहे. त्याचे पडसाद पुण्यामध्ये मध्ये देखील पहायला मिळाले. भारतीय जनता पार्टीच्या शिवाजीनगर भाजपा महिला आघाडीच्या वतीने शनिवारी गोखले नगर येथे कुसाळकर चौकाततील मारुती मंदिर येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करत डॉ. अपर्णा गोसावी यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व सामान्य नागरिक अतिशय निराश आणि नकारात्मक विचारांमध्ये जीवन जगत असताना त्याला कुठेतरी सकारात्मकता आणि ऊर्जा देण्याचं काम आपली प्रार्थना स्थळे करीत असतात . आशा वेळी उद्धव ठाकरे सरकारने दारूविक्रीला तर परवानगी दिली,पण आमची धार्मिक स्थळे कुलूप घालून बंद ठेवलेत. त्याचप्रमाणे प्रत्येक धार्मिक स्थळाजवळ काही स्टॉल धारक असतात की त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर असतो. आशा नागरिकांनी काय करावे, कुठे जावे, या सर्व गोष्टींचा जाब विचारण्यासाठी आणि धार्मिक स्थळे खुली करून सर्वसामान्य जनतेला मनःशांती मिळावी या हेतूने हे घंटानाद आंदोलन करण्यात आले. असे या आंदोलनाच्या संयोजक व शिवाजीनगर महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉ.अपर्णा गोसावी यांनी आपले मत मांडताना असे सांगितले
या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी जी अनासपुरे, नगरसेवक आदित्य माळवे, पुणे शहर उपाध्यक्ष योगेश बाचल, शिवाजी नगर सरचिटणीस गणेश बगाडे , शकीलभाई सय्यद , स्वीकृत नगरसेवक प्रभाकर पवार, शहर चिटणीस मंगलताई डेरे, वृक्ष संवर्धन समिती सदस्य संदीप काळे, शहर युवा मोर्चा चिटणीस किरण ओरसे, सोशल मिडिया शिवाजीनगर अध्यक्ष निलेश धोत्रे, व्यापारी आघाडी अध्यक्ष विकास डाबी, योगेश बहिरट, किरण बदामी, सचिन क्षीरसागर, यश निकम, दिलीप शेळके, सुजित गोटे, तसेच शिवाजी नगर महिला आघाडी च्या वैदेही काळे, मनाली तागुंदे, सुनीता श्रीधर, प्राजक्ता पाटील,मंजू वाघमारे, अनुष्का नलावडे, प्राजक्ता डांगे, मीरा वैराट, मनीषा सुर्वे, छाया साठे, कविता काळे, कविता चव्हाण, रेखा मांजरेकर, सारिका कुसाळकर, सुनीता जाधव आदी उपस्थित होते .