गणेशउत्सव आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर "आवाज कलाकारांचा" या शीर्षकाखाली चर्चासत्र संपन्न

विशाल भालेराव 

सिंहगड टाईम्स- साऊंड इलेक्ट्रिकल्स  जनरेटर असोसिएशन पुणे आणि पूणे आर्टिस्ट असोसिएशन (PAA) यांच्या संयुक्त विद्यमानाने आवाज कलाकारांचा या शीर्षकाखाली एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये माननीय नगरसेवक विशाल जी तांबे नगरसेवक गणेश जी बिडकर माजी विरोधी पक्षनेते आणि विद्यमान नगरसेवक अरविंद जी शिंदे भरत मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब  दाभेकर तसेच उद्योजक दीपक जी धावडे तसेच नगरसेवक विशाल धनवडे मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले तसेच नगरसेवक दिलीपजी गिरमकर तसेच पिसोळी गावचे सरपंच मचिंद्रजी दगडे व उपसरपंच दिपकजी धावडे आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र (अण्णा ) भिंताडे उपस्थित होते.

 या कठीण अश्या काळामध्ये कलाकार त्यांचे सहकारी आणि इतर तंत्रज्ञ यांनी कशाप्रकारे कार्यक्रम सादर करावेत किंवा त्यांना कशा प्रकारे उपजीविका करता येईल हा चर्चेचा मुख्य विषय होता या आगामी गणेशोत्सवाच्या काळात कलाकारांना छोटेखानी कार्यक्रम तसेच संगीतकारांना घेऊन लाईव्ह कार्यक्रम सादर करण्यासाठी या कलाकारांना सहकार्य करावे असे सर्व गणेश मंडळांना आवाहन केले गेले पुण्यामध्ये जवळपास चार हजार गणेश मंडळ आहेत गणेश मंडळाने छोटे स्पीकर लाईटच्या माळा आणि जिथे गरज आहे ते जनसेट यांना जरी परवानगी देत आली तर थोड्या प्रमाणात का होईना या सर्व कलाकार परिवाराला थोडी मदत होईल असे मत प्रकर्षाने मांडण्यात आले आम्हाला असे कार्यक्रम देऊन कला सादर करण्यासाठी परवानगी आणि संधी मिळावी अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संदीप पाटील यांनी केले तसेच साऊंड इलेक्ट्रिकल जनरेटर असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमजानी यांनी प्रास्ताविक केले.

 यावेळी प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक शेखर गरुड रशिद शेख शैलेश गायकवाड व साऊंड इलेक्ट्रिकल जनरेटर असोसिएशनचे पदाधिकारी संजयजी टोलगे, उदयभाई शाह, बंडूशेठ वाळवेकर, रमेशजी धोत्रे, मेहबूब खान, राजू कांबळे, शिरीष पाठक, सोमनाथजी धेंडे, सचिनजी नासरे, सूर्यकांतजी बंडावणे, सौरभजी वर्मा, जुनेद वाणी, उदयजी इनामके, स्टीवन नाथन, राहुल ओव्हाळ, अभिजितजी राठोड, उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.