सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मंदिरं उघडण्याची शक्यता, मात्र यामध्ये आरोग्याचा विषय फार महत्त्वाचा, रोहित पवार


 राज्य सरकारने दारू दुकाने उघडण्यासाठी परवानगीने दिली मात्र धार्मिक स्थळे बंद का? असा प्रश्न उपस्थित करत भाजपाच्या वतीने आज (२९ ऑगस्ट) ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. यावर बोलताना आमदार रोहित पवारांनी सांगितलं की, 'मी आंदोलनाच्या संदर्भात सांगणार नाही. फक्त एवढेच म्हणतो की आरोग्याचा विषय आपण घटकाभर बाजूला ठेवून मंदिराच्या अवतीभवती असणारे जे दुकान आहे त्यांच्या अर्थकारणाचा जो विषय आहेत याचा विचार आपण जर केला आणि धार्मिक भावनांचा विचार केला तर मंदिर उघडावेत असं माझं म्हणणं होतं, आणि तसं मी बोललो देखील होतो.'

'पण विषय एवढाच आहे की, आपली मंदिरं बघितलं तर मंदिराचा गाभा लहान असतो आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांची झालेली गर्दी या मंदिरात वाढली तर आरोग्याचे अडचण येऊ शकते.' असंही रोहित पवार म्हणाले.   

मात्र या संदर्भात आरोग्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री असतील ते याबाबत योग्य तो विचार करुन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात योग्य निर्णय घेतील. असं मला वाटतं. पण फक्त अर्थकारण एवढाच विषय नसून याच्यामध्ये आरोग्य हा फार महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे बघूया सरकार याबाबत काय निर्णय घेतं.' अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला लॉकडाऊन लागूकरताना देशातील सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. मात्र अनलॉक-१ च्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने ८ जून पासून अटी शर्तींसह सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे उघडण्याची परवानगी दिली होती. याला अनुसरून अनेक राज्यात धार्मिक स्थळं उघडण्यात आली आहेत मात्र महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळे अद्याप बंद आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.